Just another WordPress site

यावल येथील डांगपुरा परिसरातील २५ वर्षापासूनचा प्रलंबीत पाण्याचा प्रश्न आमदार अमोल जावळेंच्या सुचनेवरून मार्गी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार

येथील शहरातील नगरपरिषद कार्यक्षेत्रातील डांगपुरा परिसरात गेल्या मागील २५ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या प्रलंबीत होती व या प्रश्नाकडे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक उमेश फेगडे यांनी गांर्भीयाने लक्ष देत आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शन सुचने वरून शेवटी पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने अल्पसंख्यांक समाज बांधवांनी आभार व्यक्त केले आहे.

दरम्यान शहरातील डांगपुरा परिसरात राहणाऱ्या अल्पसंख्यांक बांधवांना मागील २५ वर्षांपासुन पिण्याचे पाणीच्या समस्याने त्रस्त झाले होते.व या परिसरातील सामाजीक कार्यकर्ते ईमरान पहेलवान यांच्यासह परिसरातील तरूणांनी यावलचे माजी नगरसेवक उमेश फेगडे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली.यावेळी उमेश फेगडे यांनी आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्या मार्गदर्शन सुचनेवरून नगर परिषद प्रशासनाच्या तात्काळ जलवाहीनीचे काम वेगाने करीत पाण्याचा २५ वर्षापासुनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावला आहे.सदरहू सदर बाबीचे ईमरान पहेलवान,झाकीर खान,आसीफ खान,मंजुर खान,शकील खान,अल्ताफ शेख, उमर कच्छी व नागरीकांनी आणी तरुणांनी यावेळी आमदार अमोल जावळे व उमेश फेगडे यांचे आभार व्यक्त करीत त्यांचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.