यावल-फैजपुर महामार्गावरील चाळणीयुक्त रस्त्यामुळे “रस्ता खडुयात की खड्डयात रस्ता” वाहनधारकांपुढे पेच !!
सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष पुरवुन प्रश्न मार्गी लावण्याची वाहन धारकांची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार
यावल-फैजपूर १८ किलोमिटर लांबीच्या महामार्गावर ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे सदर रस्त्याची खड्डयांमुळे “रस्ता खडुयात की खड्डयात रस्ता”अशी फारच बिकट अवस्था झाली असुन वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवितांना मोठी तारेवरची कसरत अरुण वाहन चालवावे लागत आहे.तसेच सदरील खड्डे हे मोठया अपघातास आमंत्रण देणारी असुन यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीला गांभीर्याने घेवुन रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.
यावल ते फैजपुर या मार्गावरील महामार्गाचा हा रस्ता असून या मार्गावरून गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावरील रस्त्यावर मागील काही वर्षापासुन वाहतुकची वर्दळ वाढली असुन व असे असतांना हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षीत नसल्याचे दिसून येत आहे.यावल ते फैजपुर पर्यंत असलेल्या १८ किलोमिटरच्या रस्त्यावर ठीक ठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारी मोठमोठी खड्डे निर्माण झाली असुन या मार्गावर मोठमोठे अपघात झालेले असून यात अनेक नागरीकांनी आपला जिव गमावले आहे.दरम्यान यावल ते फैजपुर पर्यंतच्या १८ किलोमिटर लांबीचा हा रस्ता खड्डयात आहे की खड्डयात रस्ता आहे या प्रश्नाचे वाहनधारकांना उत्तर मिळत नाही.परिणामी यावल सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.