राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावचा संघ विजयी घोषित !! जिल्ह्यातील १५ खुळाडूंनी मिळवले सुवर्ण व रौप्य पदके !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१८ सप्टेंबर २५ गुरुवार
लातूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.या स्पर्धेत राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांमधून २५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यात जळगाव जिल्ह्यातील १५ खेळाडूंनी सहभाग नोंदवून सर्वांनी पदक जिंकत जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
दरम्यान भडगाव येथील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत.यात जुनेद खान शाकीर खान-सुवर्णपदक,प्रतीक सतीश दाभाडे-सुवर्णपदक,फैजान मुस्तकीम खान-रौप्यपदक,चेतन भैय्यासाहेब भोई- रौप्यपदक,आर्यन निलेश ब्राह्मणकर-रौप्यपदक,गौरव मनोज पाटील-रौप्यपदक,चाळीसगाव येथील विजेते खेळाडू :-जियान कयूम खान-सुवर्णपदक,इझान जुबेर खान रंगरेज-सुवर्णपदक,मोहतशिम मुशर्रफ खान-सुवर्णपदक,मुजक्कीर मुशर्रफ खान-सुवर्णपदक,हुमजा सिराज शेख-सुवर्णपदक,खिजर हबीब खान-सुवर्णपदक,उमर फारुक खान-रौप्यपदक,सुलतान ऐलावर रंगरेज-सुवर्णपदक, ओम गौतम गोयार-सुवर्णपदक हे आहेत.या यशामध्ये चाळीसगाव थाय बॉक्सिंगचे सचिव आयान खान व महाराष्ट्राचे कोच शाहरुख नजीर मण्यार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जळगाव जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी,उपाध्यक्ष शाम पाटील तसेच पदाधिकारी डॉ.वसीम मिर्झा,सौरभ पाटील,संतोष पाटील,सौरभ देशमुख,अजगर खान,हाजी खलील शेख आणि प्रशिक्षक अबरार खान सहसचिव,थाय बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.या विजयानंतर आता भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची निवड नोव्हेंबर महिन्यात पंजाब,अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली असून सर्वत्र या खेळाडूंचे कौतुक होत आहे.