Just another WordPress site

यावल एस.टी.आगारात कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा भीम आर्मीकडून भांडाफोड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ सप्टेंबर २५ गुरुवार

जळगाव जिल्ह्यातील यावल एस.टी.आगार शांतपणे आपले दैनंदिन कामकाज करत असला तरी मागच्या काही महिन्यांपासून इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून व्यवस्थापनाकडून होणारी मनमानी,जातीपातीवर आधारित अपमानास्पद वागणूक आणि सततचा मानसिक त्रास यामुळे कर्मचारी त्रस्त होते व अखेर या सर्व तक्रारींचा भांडाफोड करण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन मैदानात उतरली आहे.काल दि.१७ सप्टेंबर रोजी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते यावल आगारात दाखल झाले परिणामी अचानक एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने आगारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.प्रसंगी कर्मचाऱ्यांमध्ये एकीकडे दिलासा तर दुसरीकडे भीतीचे वातावरण दिसून आले.

दरम्यान संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत व जातीच्या आधारावर भेदभाव करणे हा गंभीर अपमान असून शासन सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने अशी वागणूक देणे लाजिरवाणे आहे.प्रसंगी भीम आर्मी पदाधिकाऱ्यांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.प्रसंगी अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कबुली दिली की,आमच्यावर मनमानी बदल्या,सुट्ट्यांवर अडथळे,जातिवाचक भाष्य आणि शिस्तभंगाच्या धमक्या दिल्या जातात.या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी स्पष्ट इशारा दिला की,यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याला मानसिक त्रास दिला तर गाठ थेट भीम आर्मीशी असून अन्याय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही यामुळे दीर्घकाळ भीती खाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धीर आला.अनेकांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली मते मोकळेपणाने व्यक्त केली.भीम आर्मीने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल  करण्यात येणार आहे तसेच त्यांची बदली व निलंबनाची मागणी केली जाणार असल्याचे भीम आर्मीच्या वतीने कळविण्यात आले आहे.सदरहू यावर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा संघटक संदीप सपकाळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर,तालुका उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, बबलू गजरे,चंदू पारधे,सतीश अडकमोल,गौरव सोनवणे,राजू तडवी,युनुस तडवी,प्रदीप वानखेडे,राजू पिंजारी,मिलिंद जंजाळे,फिरोज तडवी जिल्हा सचिव,सचिन वानखेडे,करण अडकमोल,सोहन गजरे,आशिष तायडे,योगेश भील,करण मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.