जावेद शेख,पोलीस नायक
भडगांव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२० सप्टेंबर २५ शनिवार
भारताचे पतंप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवडा दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर याकालावधीत पंधरवडा सप्ताह अंतर्गत येथील जि.प.मराठी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.स्वच्छता अभियानद्वारे स्वच्छतेचे महत्व विषद करत अभियानात परिसरातील नागरिक पालकांनी सहभाग नोंदविला.

सदर प्रसंगी शेतकरी संघ संचालिका तथा नगरसेविका योजना पाटील,मुख्याध्यापिका मिरा साळुंखे,कार्यकारणी सदस्य पदाधिकारी नूतन पाटील,रेखा पाटील,मनिषा पाटील,सुरेखा वाघ,निता भांडारकर,उषा परदेशी,जिजा चव्हाण,सुरेखा पाटील,सोनाली पाटील,मिनाक्षी पाटील,प्रतिभा पाटील,शिक्षिका ज्योती साळुंखे,रजनी पाटील,शर्मिला सूर्यवंशी,भारती गरुड,उज्वला पवार,श्रुती कदम यांनी सहभाग नोंदवित स्वच्छता अभियानात यशस्वी केले.