धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ सप्टेंबर २५ रविवार
सध्या सोप्या मार्गाने पैसे कसे कमवता येतील यामागे तरुणाई भरकटली असून काहीअंशी याला जबाबदार आपणच आहोत व पारिवारिक सलोखा,नात्यातील दुरावा यामुळे वाढत आहे.चौकोनी कुटुंबात मुलांचे बालपण हरवले आहे,मूले एकलकोंडी झाली आहेत,हट्टी मुलांना तो चूप रहावा म्हणून मॉडर्न मम्मी पप्पा मोबाईल त्याच्या पुढ्यात ठेवतात व त्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालण्या सारख्या घटना घडत आहेत.
दरम्यान धुळे जिल्ह्यातील वरखेडी गाव येथील रहिवाशी सुनील रणधीर या तरुणाची परिस्थिती जेमतेम असून शिवणकाम करून उदरनिर्वाह करतात.तसेच त्यांचा एकुलता एक मुलगा चि.मयूर सुनील सोनार वय अवघे १९ वर्ष याला ऑनलाईन गेम खेळण्याची लत लागली होती आणि यादरम्यान सदरील युवकावर दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज झाले.परिणामी या परिस्थितीत मयूर रणधीर या युवकाने टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येस प्रवृत्त झाला.सदरहू परिवारातील तरुण मुलाचा बळी गेल्याने सुनील सोनार यांचा परिवार शोक सागरात असून त्याचे मृत शरीर अद्याप हाती लागले नाही तर शासनाचे व परिवाराचे प्रयत्न सुरू आहे.