वड्री गावात काँग्रेसचा “सुपडा साफ” !! शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार अमोल जावळेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ सप्टेंबर २५ रविवार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यात मोठा झटका काँग्रेसला बसला असून वड्री गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाल्यामुळे येथे काँग्रेसचा “सुपडा साफ” झाला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हा मोठा प्रवेश करण्यात आला आहे.
दरम्यान वड्री गावातील माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव व सरपंच अजय भालेराव यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश सोहळा पार पडला.ग्रामपंचायत सदस्य फकीरा अरमान तडवी व परवीन मुबारक तडवी यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला.या प्रवेशामध्ये गावातील प्रमुख नेते अमित ईतबार तडवी,नामदार जमशेर तडवी,सलीम अहमद तडवी, रुबाब नवाब तडवी,सिकंदर सुजान तडवी,असलम हसन तडवी,मुस्तफा यासीन तडवी,तुरेबाज अकबर तडवी,अयमद बशीर तडवी,अल्लाउद्दीन साहेबु तडवी,खेतिया पटला,मुलजी बारेला,भरत बारेला,कालसिंग बारेला,लाकड्या बारेला,जुम्मा तडवी,मुशीर वैजू तडवी,कलिंदर सिकंदर तडवी,नशीर निजाम तडवी,संजय गणेश रस्तुल,बाई सुलेमान तडवी,सकीना अरमान तडवी यांचा समावेश आहे.सदर प्रवेश सोहळ्यास प्रदेश परिषद सदस्य हिरालाल चौधरी,प्रदेश सदस्य हर्षल पाटील,खरेदी विक्री संघ उपसभापती अतुल भालेराव,खरेदी विक्री संघ संचालक विलास चौधरी,देविदास पाटील,उमेश फेगडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे,संचालक सागर महाजन,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे,वड्री गावचे उपसरपंच पंकज चौधरी व वड्री गावचे माजी सरपंच ललित चौधरी,विकासो चेअरमन उमाकांत पाटील,संदीप चौधरी,किनगाव मंडळ कोषाध्यक्ष दिनेश पाटील,यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी,यावल सरचिटणीस भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे,निलेश गढे आदी मान्यवर उपस्थित होते.