Just another WordPress site

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यावल तालुका प्रमुखपदी शरद कोळी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ सप्टेंबर २५ रविवार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,विधानसभा संपर्क प्रमुख अनिल काकडे,जळगाव जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शना अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यावल शहरातील पक्षाचे एकनिष्ठ कणखर शिवसैनिक व सर्वसामान्याच्या कार्यासाठी सदैव तत्पर असलेले शरद रंगू कोळी यांची यावल तालुका प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

दरहू शरद कोळी यांच्या निवडीबद्दल शिवसेना उबाठाचे यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,गोपाळ चौधरी,संतोष धोबी,योगेश चौधरी,विजय कुंभार,पिंटू कुंभार,सुरेश कुंभार,प्रवीण लोणारी,अझहर खाटीक,बी एम पाटील,आर के चौधरी,सूरज कोळी,प्रदीप वानखेडे,निवृती खांबायत,नितीन कोळी,संदीप माळी,सुभाष वाघ,प्रकाश वाघ,रवी सपकाळे,योगेश राजपूत पाटील,विजय कवडीवाले,भरत कोळी,निलेश पाराशर आदिनी मनापासून अभिनंदन व भगव्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद कोळी यांच्या निवडीने व नियुक्तीने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे.पक्ष यावल तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले असून येणाऱ्या सर्व निवडनुकीत सर्वत्र लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.