भडगाव तालुक्यात कर्मवीर हरि रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाअंतर्गत सप्ताह सोहळ्याचे आयोजन !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२२ सप्टेंबर २५ सोमवार
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत संस्थेच्या विविध शाखांवर उल्लेखनीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.२३ सप्टेंबर मंगळवार रोजी संस्थेच्या सर्व शाखांवर चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन होईल.यात सौ साधनाताई पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यालय आमडदे येथे ‘अहिराणी कवी संमेलन’ सकाळी ठीक ८ वाजता संपन्न होईल.या कार्यक्रमात अहिराणी कवी पी पी पाटील,कवी वेदराज कपाटे,कवी वि ना बागुल,कवी रमेश धनगर हे सहभागी होतील.जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,गिरड येथे सकाळी ९ वाजता प्रा डॉ संजीव गिरासे यांचे ‘कथाकथन’,माध्यमिक विद्यालय शिंदी येथे दूपारी १२ वाजता ‘हसू आणि आसू’ या विषयावर शिवव्याख्याते सचिन देवरे पाचोरा यांचे व्याख्यान तर लाडकूबाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे दूपारी २ वाजता हभप अनिल महाराज वसमानेकर यांचे किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान माध्यमिक विद्यालय भातखंडे येथे याच दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी ‘संमोहन आणि अभ्यास’ याविषयी योगेश बारी पाचोरा बोलतील तर याचवेळी माध्यमिक विद्यालय अंजनविहिरे येथे ‘दंत आरोग्य’ यांवर डॉ प्रफुल्ल पाटील भडगाव यांचे मार्गदर्शन असेल.माध्यमिक विद्यालय महिंदळे येथे सायंकाळी ८ वाजता ‘आयतं पोयतं सख्यानं’ यांच तुफान गाजलेली एकपात्री प्रवीण माळी, शिरपूर सादर करणार आहेत.दि.२४ सप्टेंबर रोजी माध्यमिक विद्यालय वडजी ता भडगाव येथे दूपारी बारा वाजता ‘वैज्ञानिक जादूचे प्रयोग’ शुशांत जगताप,गुढे तर याच वेळी माध्यमिक विद्यालय पळासखेडे ता भडगाव येथे ‘छत्रपती संभाजी राजे’ यांच्या जीवनावर बाळासाहेब जडे भडगाव व्याख्यान देतील.दि.२५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल गिरड येथे ‘मैत्री करूया पक्षांशी’ पक्षीमित्र अश्विन पाटील अमळनेर सकाळी ९ वाजता सादर करतील.दि.२७ सप्टेंबर रोजी कै गो पू पाटील विद्यालय कोळगाव ता भडगाव येथे सकाळी ८ वाजता ‘आरोग्य व समुदेशन’ डॉ सौ शुभांगी पूर्णपात्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.दि.२८ सप्टेंबर रोजी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे तसेच पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्त गावाच्या लाभार्थींना शिधावाटप करण्यात येणार आहे.दि.३० सप्टेंबर रोजी पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता आमडदे ता भडगाव येथे होणार आहे असे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,उपाध्यक्षा डॉ पूनम पाटील,सचिव प्रशांत पाटील व संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे तसेच विविध शाखा मुख्याध्यापकांनी कळविले आहे.