Just another WordPress site

फैजपूर येथे “सेवा पंधरवडा” अंतर्गत प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ सप्टेंबर २५ बुधवार

तालुक्यात पंतप्रधान नरेन्द्र मोदीच्या वाढदिवसापासुन दि.२३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा संपन्न होत असुन यानिमित्ताने धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर तालुका यावल येथे काल दि.२३ सप्टेंबर मंगळवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.यानिमित्ताने येथील प्रांत कार्यालयातर्फे “महाविद्यालयीन प्रमाणपत्र वाटप शिबिर अंतर्गत” प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबन काकडे आणि यावल तालुक्याचे नायब तहसीलदार बी.एम.पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या पुढाकाराने व यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांचे प्रयत्नाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र व दाखले वाटप करून विद्यार्थ्याचा वेळ आणि श्रम वाचविल्याबदल प्रांताधिकारी बबन काकडे यांना उपस्थितांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले.एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले प्रांताधिकारी बबन काकडे हे या कार्यक्रमास उपस्थित आहेत याचा आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी साहेबांपासून नक्कीच प्रेरणा घेतील असे सांगितले.नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वाटप करण्यात आलेले दाखले व प्रमाणपत्रे किती महत्वाची असतात व अशा उपक्रमांच्या माध्यमातून शासन नेहमीच नागरिकांसाठी तत्पर आहे असा विश्वास दिला.त्यांनी अनुभवातून सांगितले की,काही वर्षापूर्वी एका विद्यार्थ्याचा इंजिनियरिंगचा प्रवेश थांबला होता म्हणून तात्काळ सेवा देत रात्री ११ ते १२ दरम्यान स्वतः ऑनलाइन मंजुरी देत प्रमाणपत्र वितरित केले होते असे अनेक उदाहरण देत विश्वास जागवला तसेच उपस्थितांना आयुष्यात खूप मोठे होण्यासाठी अवांतर वाचन केले पाहिजे त्यातून आपले व्यक्तिमत्व कसे खुलवता येते हे स्वतःच्या अनुभवातून सांगितले.प्रसंगी धनाजी नाना कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय फैजपूरच्या उपस्थित विद्यार्थ्यांना ३२ जातीचे दाखले,३१ डोमेसाइल,४७ उत्पन्नाचे दाखले आणि २७ नॉन क्रिमिलियर असे विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी यावलचे नायब तहसीलदार बी.एम.पवार,फैजपूर मंडळ अधिकारी शेलकर,ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत केंद्रे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरीश नेमाडे सर्व प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रा.उत्पल चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.