Just another WordPress site

यावल येथे घरात पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळून आल्याने चर्चेला उधाण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ सप्टेंबर २५ गुरुवार

येथील विस्तारीत वसाहती मधील परिसरातील एका घरातुन दुर्गंधी येत असल्याने तपासणीत त्या घरात एका व्यक्तिचा मृत अवस्थेत मृतदेह मिळून आला असून या घटनेच्या ठीकाणी पोलीस पहोचले असून त्या घराचा पंचनामा करण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल शहरातीत विस्तारीत वसाहतीमधील पांडूरंग सराफ नगर वस्तीत पशु अधिकारी भगुरे हे मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्या
समोर असलेल्या आत्माराम गुरूजी यांच्या घरात राहात होते ते मूळ सेलू जिल्ह्य परभणीचे राहणार आहे.दरम्यान यावल येथे गुरांच्या दवाखान्यात प्रभारी व पाडळसा येथे पशुधन कार्यरत असलेले पशुधन अधिकारी रतनलाल छोटूलाल भगुरे हे यांच्या घरात गेल्या वर्षापासून भाडयाने राहात होते व गेल्या तिन चार दिवसापासुन ते कुणालाच दिसुन आले नाही.आज अचानक ते राहात असलेल्या घरातुन अतिशय दुर्गंधी सुटल्याने आजुबाजुच्या राहणाऱ्या नागरीकांना त्रास जाणवत होते व अखेर त्या घरात पशुधन अधिकारी रतनलाल छोटूलाल भगुरे हे मृत अवस्थेत मिळून आले आहे.प्रथम दर्शनी चौकशीत पशु वैद्यकीय अधिकारी रतनलाल भगूरे वय ४८ वर्ष मुळ राहणार सेलु जिल्हा परभणी यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असावा असा अंदाज असून ते या घरात एकटेच राहात असल्याने त्यांना वेळीच उपचाराची मदत मिळू शकली नसल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा असे बोलते जात आहे.याबाबत यावल पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे व पोलीस या घटने तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.