यावल प्रादेशीक वनविभागाकडून सागवान झाडांची वृक्षतोड करणाऱ्या तिन जणांकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० सप्टेंबर २५ मंगळवार
यावल प्रादेशिक वनविभागास मिळालेल्या गुप्त संदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर व रेंज स्टाफ वैजापूरसह नियतक्षेत्र मालापूर उत्तर कक्ष क्रमांक २३१ या भागात गस्त करीत असतांना काही अज्ञात इसम हे साग वृक्ष तोड करत आहेत असे माहीत झालेवरून त्यांच्याकडील असलेले कुऱ्हाडीचा आवाजाच्या दिशेने गेलो असता त्यांना आमची चाहूल लागताच पसार झालेत तरी त्यांचा पाठलाग केला असता स्टाफने त्यांना घेराव घालून ३ इसम पकडण्यात आले.
सदरचे इसम यांनी तयार केलेले सागवान नग १४ जप्त करण्यात आले व त्यांचे मोजमाप केले असता एकूण घन मीटर ०,५७९ असून मालाची किंमत १३२७५ एवढी आहे तसेच जंगल भागात फिरून पाहिले असता त्यांनी लपवलेले २ मोटार सायकलही जप्त करण्यात आले यात वाहन किंमत अंदाजे रूपये ४५००० एवढी आहे.सदरच्या घटनेबाबत वनरक्षक मालापूर उत्तर यांनी प्रथम गुन्हा जारी केला आहे.सदर कार्यवाही निनू सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशिक,जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे,एम बी पाटील सहाय्यक वनसंरक्षक चोपडा,समाधान पाटील सहाय्यक वनसंरक्षक यावल,विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली असून कार्यवाहीत वैजापूर वनक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक,वनसेवक,वाहन चालक उपस्थित होते.तरी विकेश ठाकरे सर वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांचे कडून जनतेस आव्हान करण्यात येते की आपल्या वनक्षेत्रास लागून कोणत्याही प्रकारे वन वनवा,अवैध वृक्षतोड अवैध लाकूड वाहतूक अतिक्रमण,वन्यजीव तस्करी अशा प्रकारचा गुन्हा निदर्शनास आल्यास शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.