Just another WordPress site

यावल येथे स्मार्ट मीटरच्या अवाजवी बिलांच्या विरोधात वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० सप्टेंबर २५ मंगळवार

शहरातील वाणी गल्लीत असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात यावल न.पा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सह नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांना नुकताच घेराव घालण्यात आला.शहरात नव्याने बसवलेले स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरीकांना अवाजवी येत आलेल्या बिलाबाबत संताप व्यक्त करण्यात आला.सदरहू तात्काळ स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.स्मार्ट मिटरच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान स्मार्ट मीटरची तपासणी केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

शहरातील वाणी गल्लीत राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय असून या कार्यालयात काल दि.२९ सप्टेंबर सोमवार रोजी माजी नगराध्यक्ष न पा. यावल अतुल पाटील यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरचे अवाजवी आलेले बिल घेऊन मोठ्या संख्येत नागरिकांनी आंदोलन केले व उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांना घेराव घातला.प्रसंगी अनेकांनी आपले जुने व नवीन वीज बिल या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर केले व त्यांना निवेदन देण्यात आले.यात त्यांनी म्हटले आहे की,शहरात दोन-तीन महिन्यापासून नवीन स्मार्ट मीटर विद्युत वितरण कंपनीमार्फत बसवले गेले आहे हे स्मार्ट मीटर जास्त फिरत असून त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज बिले हे जास्तीचे येत आहे.तसेच अवाजवी वीज बिले येत आहे कमी वापर करूनही मोठ्या प्रमाणावर बिल आले आहेत परिणामी मोठ्या प्रमाणावर आलेले बिल सर्वसामान्य ग्राहक भरू शकत नाही.सदर स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी असल्यामुळे सदर स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे जुनेच मीटर लावण्यात यावे अशी मागणी असून आलेले बिल यांच्या संदर्भात देखील तात्काळ मीटर तपासणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.प्रसंगी भरत भोई,जुगल घारू,सागर कोळी,नरेंद्र शिंदे,गोलू माळी, कृष्णा चौधरी,राहुल कचरे सह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.