Just another WordPress site

टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूल भडगाव येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी गरबा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात !!

जावेद शेख,पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑक्टोबर २५  बुधवार

भडगाव येथे टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूल भडगाव येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी गरबा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सुमारे ३५ ते ४० पालकांनी सहभाग घेतला.पालक स्पर्धा विजेते,विद्यार्थी विशेष पुरस्कार,गरबा स्टार आयकॉन व स्टायलिश स्टार आयकॉन या विशेष पुरस्कारांनी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले.

या कार्यक्रमास मान्यवर म्हणून टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूल भडगावचे डायरेक्टर भुषण गढरी,तुषार पाटिल,प्रशांत पाटिल,चिराग महाजन आदी उपस्थित होते.तर शिक्षक वर्गातील मयुरी राऊत,चैतन्या पाटिल,सोनाली नेरपगार,गायत्री पाटिल व कविता पाटिल यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमात रंगतदार परफॉर्मन्सेस,आनंदी वातावरण व गरब्याची धूम पाहायला मिळाली.पालक व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेत सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.