Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे सहकार भुषण पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑक्टोबर २५ बुधवार

तालुक्यातील कोरपावली येथील रहीवासी व कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे यांना नवराष्ट्र वृत्त समुहाच्या वतीने सहकार भुषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सहकार क्षेत्रात शेतकरी हितासाठी भरीव अशी उल्लेखनिय कामगिरी करणारे तरुण शेतकरी व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती राकेश वसंत फेगडे यांच्या कार्याची दखल घेत नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाच्या वतीने जळगाव येथील नियोजन विकास भवनात राज्याचे पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,आमदार राजु मामा भोळे,आमदार अमोल जावळे,आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगाव जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राकेश फेगडे यांना सपत्नीक सहकार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राकेश फेगडे यांना मिळालेल्या सहकार भुषण पुस्काराचे शेतकरी व समाज बांधवांच्या वतीने कौत्तुक करण्यात येत असुन सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.