यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरीक त्रस्त तर नगर परिषद निद्रा अवस्थेत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ ऑक्टोबर २५ शुक्रवार
येथील शहरातील सार्वजनिक ठिकाणी व विस्तारित वसाहतीच्या क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असुन शाळकरी बालकांना चावा घेणे व दुचाकी वाहनांवर धावुन जाणे हे प्रकार रोज घडत असुन सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.निर्लज्ज नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची संत्पत प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहे.
यावल नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विस्तारीत वसाहतील फालक नगर,पांडुरंग सराफ नगर,तिरूपती नगर,आयशा नगर,प्रभुलिला नगर या परिसरात गेल्या अनेक दिवसापासुन मोकाट कुत्र्यांनी उच्छाद माजवला असुन या मार्गाने जाणाऱ्या लहान शाळकरी बालकांच्या व पायदळी जाणाऱ्या महीलांच्या अंगावर जावुन त्यांना चावा घेणे,दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर धावणे,दहा ते पंधरा कुत्र्यांचे टोळके शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार करीत आहेत व त्यामुळे पशुपालक देखील त्रस्त झाले आहेत.सदरहू हे प्रकार नियमीत घडत असुन यावेळी दुचाकी मोटर वाहनांचे अपघात होतांना दिसत आहे.दरम्यान यावल नगरपरिषद प्रशासनाकडे या मोकाट व आरोग्यास धोकादायक कुत्र्यांच्या त्रासाबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी असतांना निर्लज प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची संत्पत प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहे.नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास या परिसरात फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून यावल नगर परिषदच्या कार्यालयात सोडा अशी ही संत्पत प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करीत आहे.