Just another WordPress site

आमडदे येथील सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०४ ऑक्टोबर २५ शनिवार  तालुक्यातील आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेमध्ये काल दि.३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग जळगाव अंतर्गत भडगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे व पर्यवेक्षक वाय एम देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक नामदेव पाटील यांनी एड्स या आजाराविषयी जनजागृती केली.त्यात मुला मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल,नैसर्गिक बदल,भावनिक बदल याविषयी माहिती दिली आणि हा वयोगट वादळी वयोगट असल्याने विद्यार्थ्यांनी या आजारापासून लांब राहण्याचे आवाहन केले तसेच हा आजार कशामुळे होतो त्याची कारणें त्यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांच्यासमवेत भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रूपाली पाटील (प्रयोगशाळा तंत्रज्ञ),सलीम पटेल (लिंक वर्कर साने गुरुजी फाउंडेशन) इत्यादी जण उपस्थित होते.त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड यांच्या मार्फत T D म्हणजे डांग्या खोकला व धनुर्वाद या आजारांची लागण होऊ नये म्हणून इयत्ता १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.या लसीकरणासाठी आमडदे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक गणेश महाजन,आरोग्य सेवक राजरत्न जाधव,आरोग्य सेविका विजय निकम,आशा स्वयंसेविका माया पाटील,सविता पाटील,राधा पाटील व मदतनीस उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे आभार एम व्हि पाटील यांनी मानले.या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.