Just another WordPress site

अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकी चालक जागीच ठार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ ऑक्टोबर २५ रविवार

तालुक्यातील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर काल दि.४ ऑक्टोबर शनिवार रोजी  भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीला यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात ५५ वर्षीय दुचाकी चालक जागीच ठार झाला.सदर अपघातानंतर अंजाळे येथील ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण आणण्यात आला.यावल ते भुसावळ या मार्गावर अपघातात दोन जण दगावले असून वळणावरच वाढलेले काटेरी झुळपे व अंजाळे पासून वाघळूद आणी राजोरा फाटा ते यावलपर्यंत रस्त्याची झालेली दयानिय अवस्था ही वारंवार होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची वाहनधारक व नागरिकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील अंजाळे गावाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील मोर नदीच्या पुलावर यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.जी. ५०१५ या चारचाकी वाहनाने भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम.एच.१९ डि.क्यु.७३६९ द्वारे संतोष उखर्डू धनगर वय ५५ राहणार टाकरखेडा तालुका यावल हे येत असतांना समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने पुलाच्या वळणावर दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष धनगर हे जागीच ठार झाले.सदर अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी तातडीने अंजाळे ग्राम पंचायतचे सदस्य आनंद सपकाळे व काही ग्रामस्थांनी धाव घेत तातडीने यावल पोलिसांना अपघाताची माहिती दिली.घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले व मयत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला.याबाबत यावल पोलिसात दिपक धनगर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालका विरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.