Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षान पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.या वर्षाच्या अखेरीस गुजरात,हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यानंतर पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत.लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या निवडणुका महत्त्वाच्या आहेत त्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.गेल्या ३ वर्षांत चांगली कामगिरी करणारे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दुसरी टर्म मिळण्याची दाट शक्यता आहे.भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.जुलै २०१९ मध्ये नड्डा यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.२० जानेवारी २०२० रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. येत्या २० जानेवारीला त्यांचा कार्यकाळ संपेल मात्र त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नड्डा यांना दुसरी टर्म मिळेल अशी शक्यता आहे.नड्डा यांच्या आधी भाजपचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे होते.भाजपने २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यावर शहांना केंद्रात गृहमंत्रिपद मिळाले तेव्हापासून नड्डा यांनी पक्षाचे नेतृत्त्व केले आहे.

अध्यक्ष निवडण्यासाठी भाजपची स्वतंत्र प्रक्रिया आहे.भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अध्यक्ष निवडीची योजना असती तर त्यासाठीची प्रक्रिया गेल्याच महिन्यात सुरू व्हायला हवी होती कारण पक्षाध्यक्ष निवडीसाठी अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घ्यावा लागतात मात्र तसे काहीच घडलेले नाही त्यामुळे नड्डा यांनाच पुन्हा संधी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे गेल्या अडीच वर्षांत नड्डा यांची कामगिरी उत्तम राहिली आहे त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.शहांनंतर त्यांनी पक्षाची जबाबदारी व्यवस्थित हाताळली आहे.भाजपमध्ये नुकतेच काही संघटनात्मक बदल केले हे बदल नड्डा यांच्याच नेतृत्त्वाखालीच झाले त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदी त्यांनाच ठेवण्यात येईल असे अधोरेखित होत आहे.पुढील दोन वर्षांचा कालावधी भाजपसाठी महत्त्वाचा आहे.वर्षाच्या अखेरीस गुजरात,हिमाचल प्रदेशात निवडणुका आहेत त्यानंतर पुढील वर्षी कर्नाटक,त्रिपुरा,मेघालय,मिझोराम,मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड,

तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका होतील.या निवडणुकांवर नजर ठेऊन भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.