Just another WordPress site

यावल नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महीलेसाठी राखीव झाल्याने चुरस वाढणार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार

राज्यातील २४७ नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीला अखेर बहु प्रतिक्षेनंतर आरक्षण सोडतीने सुरूवात झाली असून काल मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील नगर परिषदचे आरक्षण जाहीर करण्यात आले.यात यावल नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव जाहीर करण्यात आले.

दरम्यान नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे सदरील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ईच्छुकांच्या पत्नींचे नांव पुढे येवु लागले असुन निवडणुकीच्या मोर्चे बांधणीच्या हालचालीला वेग आला आहे.काल मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्यातील सर्व २४७ नगर परिषद व नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.यावल नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडतीत यावल शहराच्या सर्वप्रथम नागरीकाची सुत्रे महीलेच्या हाती जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मागील चार ते पाच वर्षापासुन वेटिंगवर असलेल्या नगर परिषदच्या निवडणुक कधी लागतील या प्रतिक्षेत असलेले अनेक नगराध्यक्ष पदासाठी ईच्छुक उमेदवार अतुल पाटील,नितिन महाजन,उमेश फेगडे हे नागरीकांच्या संपर्कात होते.परंतु आता यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्व साधारण महिलेसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्षपदाच्या ईच्छुकांच्या पत्नींचे नांव पुढे येवु लागली आहे.यात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी छाया पाटील,सामाजिक कार्यकर्ते नितिन महाजन यांच्या पत्नी निलीमा महाजन आणी माजी नगरसेवक व भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्या पत्नी रोहीणी फेगडे यांचे नांव सद्या आघाडीवर घेतले जात असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.