Just another WordPress site

यावल नगर परिषद सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची उद्या ८ ऑक्टोबर रोजी सोडत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार

येथील नगरपरिषदच्या सन २०२५ वर्षात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती (महिला),नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.सदर निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची उद्या ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याबाबतची मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी दिली आहे.

दरम्यान आरक्षण सोडत आणि हरकती/सूचनांचा तपशील या संदर्भात जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.यात आरक्षण सोडत बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २५ वेळ:दुपारी २ वाजता स्थळ यावल नगरपरिषद सभागृह,आरक्षण प्रसिद्ध करण्याचा दिनांक गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २५,हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी गुरुवार दि.९ ऑक्टोबर २५ ते मंगळवार दि.१४ ऑक्टोबर २५ वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच हरकती व सूचना सादर करण्याची पद्धत हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणुक कार्यालयास अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालय येथे सादर कराव्यात.हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल.नगरपरिषद यावलचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी ही माहीती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.