Just another WordPress site

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली !! तर त्यांच्या जागेवर रोहन घुगे नवे जिल्हाधिकारी !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑक्टोबर २५ बुधवार

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली झाली असून त्यांच्या जागेवर ठाणे जिल्हापरिषदचे कार्यकारी मुख्याधिकारी रोहन घुगे यांची जळगावचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे.काल राज्य सरकारच्या वतीने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत.सध्या रोहन घुगे हे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सदरील बदलीचे आदेश व्ही.राधा अपर मुख्य सचिव (सेवासामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई यांच्या सहीनिशी काढण्यात आले आहे.

दरम्यान शासनाने जिल्हाधिकारी जळगाव या पदावर श्री.आयुष प्रसाद भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे.तरी सदरील सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकायाकडे सोपवून नुतन जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे भाप्रसे यांनी नवीन पदाचा कार्यभार श्री.आयुष प्रसाद भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा. तसेच वरीलप्रमाणे बदलीच्या पदावर रूजू झाल्यासंदर्भातील रूजू अहवाल Supremo प्रणालीवरही (ER Sheet मधील Posting कॉलम मध्ये) चुकता Update करावा तसे केल्याचे या विभागास कळवावे) बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरण करतांना/स्विकारतांना संबंधित अधिकारी यांनी साप्रविने दिनांक १७.११.२०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यानुसार कार्यभाराबाबत कार्यवाही करावी.) नवीन पदस्थापनेनंतर पूर्वीच्या पदावरील सर्वसंबंधित अधिकायांचे गोपनीय अहवाल / कार्यमुल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत) नवीन पदस्थापनेत ऑफिस वe-HRMS यांचा वापर वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे सुभाष उमराणीकर सह सचिव,महाराष्ट्र शासन यांनी जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.