भडगाव नगरपरिषदेचे १२ प्रभागा तील २४ जागांचे आरक्षण सोडत निकाल जाहीर !! २४ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी राखीव !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑक्टोबर २५ गुरुवार
येथील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या आरक्षणामुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.यात एकूण १२ प्रभागातील २४ जागांसाठी असलेल्या आरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे.
यात प्रभागनिहाय आरक्षण तक्ता पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र.प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण प्रकार
१ १ अ अनुसूचित जमाती महिला राखीव
ब सर्वसाधारण
२ २ अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग
ब सर्वसाधारण
३ ३ अ सर्वसाधारण महिला राखीव
ब सर्वसाधारण
४ ४ अ सर्वसाधारण महिला राखीव
ब सर्वसाधारण
५ ५ अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव
ब सर्वसाधारण
६ ६ अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव
ब सर्वसाधारण
७ ७ अ सर्वसाधारण
ब नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव
८ ८ अ सर्वसाधारण महिला राखीव
ब सर्वसाधारण
९ ९ अ सर्वसाधारण
ब नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग
१० १० अ सर्वसाधारण महिला राखीव
ब सर्वसाधारण महिला राखीव
११ ११ अ अनुसूचित जाती राखीव
ब सर्वसाधारण महिला राखीव
१२ १२ अ अनुसूचित जमाती
ब सर्वसाधारण महिला राखीव
सविस्तर विश्लेषण🔸 एकूण जागा: २४🔸 सर्वसाधारण प्रवर्गातील जागा: ८ 🔸 सर्वसाधारण महिला राखीव: ७ 🔸 नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC): ४ 🔸 OBC महिला राखीव: ३ 🔸 अनुसूचित जाती (SC): १ 🔸 अनुसूचित जमाती (ST): २ 🔸 अनुसूचित जमाती महिला राखीव: १
राजकीय परिणाम-या आरक्षणातून स्पष्ट झाले आहे की,यावेळी महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.२४ पैकी तब्बल ११ जागा महिला राखीव ठरल्या आहेत त्यामुळे भडगाव नगरपरिषदेतील महिला नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे.तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १ (महिला) व प्रभाग क्रमांक १२ (सामान्य ST) हे राखीव असल्याने या समाजाच्या प्रतिनिधींनाही राजकारणात स्थान मिळणार आहे.थोडक्यात प्रवर्ग एकूण जागा -सर्वसाधारण ८,सर्वसाधारण महिला ७,ओबीसी ४,ओबीसी महिला ३,एससी १,एसटी २ (त्यापैकी 1 महिला).या आरक्षणामुळे शहरातील अनेक इच्छुकांना उमेदवारीची संधी तर काहींना मोठा धक्का बसणार आहे.राजकीय पक्षांनी व स्थानिक गटांनी आता महिला उमेदवार शोधण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.