यावल पंचायत समितीचे आरक्षण जाहीर !! सभापतीपद सर्वसाधारण !! दिग्गजांचा गणातुन पंचायत समितीत पहोचण्याचा मार्ग बंद !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ ऑक्टोबर २५ मंगळवार
यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण काल १३ ऑक्टोबर सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केले.सभापतीपद सर्वसाधारण राहिल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या गण आरक्षणामुळे बंद पडल्याने त्यांच्या आशा मावळल्या आहेत.तर पाडळसे व मारुळ हे गण सर्वसाधारण तसेच न्हावी गण नामनिर्देशित (नामाप्र) असल्याने या तीन गणातील उमेदवार सभापतीपदासाठी मुख्य दावेदार राहतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे.पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया काल दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.यावेळी प्रांताधिकारी बबन काकडे,तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, पंचायत समिती अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात किनगाव,साकळी,दहिगाव,डांभुर्णी,भालोद या गणातील काँग्रेससह भाजपाचे अनेक दिग्गज पंचायत समितीच्या सर्वसाधारण जागांवर सभापती पदासाठी तयारीत होते मात्र आरक्षणामुळे त्यांच्या गण राखीव ठरल्याने त्यांच्या राजकीय आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत.दरम्यान न्हावी गावातील काँग्रेसचे मुरब्बी राजकारणी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक प्रभावी नेते भाजपात दाखल झाल्याने तालुक्यात भाजपचा दबदबा वाढत असून आगामी निवडणुकीत पक्ष आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:
१) हिंगोणा-अनुसूचित जाती
२) सावखेडा सीम-अनुसूचित जमाती (महिला)
३) किनगाव बुद्रुक-अनुसूचित जमाती (महिला)
४) डांभुर्णी-अनुसूचित जमाती (महिला)
५) न्हावी (प्र. यावल)-नामनिर्देशित (नामाप्र)
६) मारुळ-सर्वसाधारण
७) दहिगाव-सर्वसाधारण (महिला)
८) साकळी-सर्वसाधारण (महिला)
९) भालोद-नामनिर्देशित (महिला)
१०) पाडळसे-सर्वसाधारण
पंचायत समितीसाठी महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांचा हिरमोळ !!
दहिगाव,साकळी आणि भालोद या गणांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने या भागातील काही अनुभवी दिग्गज नेत्यांना शांत बसावे लागणार आहे मात्र ते याकरीता आपल्या जवळच्या मंडळींना किंवा विश्वासू कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या भागातील निवडणूक लढती अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
सावखेडा सीम गणातील तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या लढत आरक्षणामुळे संपली !!
सावखेडा सीम गणात दरवेळी भाजप आणि काँग्रेस यांच्यात कट्टर आणि थरारक राजकीय लढत पाहायला मिळायची परंतु यंदा या गणात अनुसूचित जमाती महिला आरक्षण लागू झाल्याने ही थरारक लढत संपुष्टात आली आहे तरीसुद्धा या गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे कारण या जागेवरून नव्या नेतृत्वाची चाचणी होणार आहे.
या गणातील सदस्यांना मिळणार सभापती पदाची संधी पाडळसे, मारुळ आणि न्हावीवर लक्ष !!
सभापती पद सर्वसाधारण असल्याने पाडळसे आणि मारुळ या गणातील इच्छुक उमेदवारांना सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत.सोबतच न्हावी गण नामाप्र असल्याने यावल तालुक्यातील या तीन गणातील उमेदवार सभापती पदासाठीची ईच्छुक असुन या मंडळीनी आपआपल्या गणात संपर्क व मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसुन येत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत विविध पक्षांच्या राजकीय बैठकांना वेग आले असुन पक्षांतर्गत रणनीती आणि गटबाजीचे सूर तालुक्यात स्पष्टपणे ऐकू येतील.
भाजपला गती,काँग्रेससमोर आव्हान !!
गेल्या काही काळात तालुक्यातील काँग्रेस मधील अनेक कार्यकर्त्यांचा आणि दिग्गजांचा भाजपकडे ओढा वाढलेला दिसतो त्यामुळे यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत भाजप अधिक प्रभावीपणे उतरेल अशी शक्यता आहे.दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष सोडून गेलेल्या काही स्वार्थी व संधी साधु मंडळीचा कोणताही परिणाम निवडणुकीत होणार नसल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या गोटातुन बोलले जात आहे. भारतीय काँग्रेस पक्षाने जोमाने आपली संघटना नव्याने मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला असून यामुळे यंदाच्या निवडणुकीत काही गणात नवे चेहऱ्यांना सर्वच पक्षांकडून पुढे चिन्हे दिसुन येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतआहे.
निवडणूक सरगर्मीला प्रारंभ !!
आरक्षण जाहीर होताच पंचायत समिती निवडणुकी साठीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.