Just another WordPress site

यावल नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन शिवसेना शिंदे गटातर्फे दिवाळी साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ ऑक्टोबर २५ गुरुवार

येथील नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच आगळा वेगळा सफाई कर्मचारी बांधवांबरोबर दिवाळी सण साजरी करण्याचा उपक्रम शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविण्यात आला.या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या पुर्व विभागाचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने नगर परिषदेच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सफाई कर्मचारी बांधवांचे पाय धुऊन तसेच दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाई व फराळ देवुन दिवाळी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

दरम्यान सफाई कर्मचारी बांधवांनी कोरोना सारख्या जिवघेण्या महामारीच्या संकटकाळात आपल्या जिवाची परवा न करता शहरात स्वच्छता राखून नागरीकांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.तसेच शहराला स्वच्छ राखण्यासाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन आनंदाचा दिवाळी सण साजरा करण्याचा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांचे विशेष कौत्तुक करीत आभार मानले.या प्रसंगी आरीफ खान,भिकन रावते, रामभाऊ सोनवणे,रहीम खाटीक व मित्रपरिवार यांच्यासह नगर परिषदचे मोबीन शेख,बबलु घारू आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.