यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २५ शुक्रवार
राज्यात होवु घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आले असून तालुक्यातील दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण आहे.सदरहू पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ.यशश्री देवकांत पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी जनतेतून व कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सौ.यशश्री पाटील या सचिव छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन यावल तसेच माजी सदस्य संजय गांधी निराधार समितीत कार्य केले असून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य,कला,क्रीडा व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत तसेच निराधार समितीच्या माध्यमातून गरीब,विधवा,अनाथ,ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.
दरम्यान तालुकास्तरावर वैद्यकीय दाखले मिळावेत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरीब गरजू लोकांना व्हावा यासाठी तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन केले असून त्यांच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.त्यांच्या कार्यात ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांचेही मोलाचे योगदान मिळत आहे.लोकांच्या मनात आपुलकी, सेवाभाव आणि प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सौ.यशश्री देवकांत पाटील या दहिगाव गण येथून पंचायत समितीसाठी सर्वात योग्य महिला उमेदवार ठरत आहेत असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला व युवक वर्गात त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून लोकहितासाठी समर्पित असलेली आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारी महिला म्हणजेच सौ.यशश्री पाटील असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा पात्र,जनसेवाभावी व लोकाभिमुख महिलेला संधी मिळावी हीच जनतेची अपेक्षा राहील उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचे सोने करून व सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे या दांपत्याने विश्वास व्यक्त केला आहे.