Just another WordPress site

यावल वन विभागाच्या नाक्याजवळ दुचाकीला चारचाकीची जोरदार धडक !! तिघे जखमी तर उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ नोव्हेंबर २५ गुरुवार

येथील शहरापासुन काही अंतरावर असलेल्या व चोपड्याकडे जाणाऱ्या अंकलेश्वर-बुरहानपूर राज्य महामार्गावरील वन विभागाच्या नाक्याजवळ काल झालेल्या भिषण अपघातात तिन जण गंभीर झाले तर त्यातील तिसऱ्या जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.यावल पोलिसांनी सदर चारचाकी वाहन ताब्यात घेत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कासारखेडा येथील रहिवासी रसूल रहिमान तडवी,आलिशान रहिमान तडवी व सलीमा रहीम तडवी हे तिघे दुचाकी क्र. एम.एच.१९ डी.वाय ९०४७ वरून यावलहून चोपड्याकडे जात होते.दरम्यान फॉरेस्ट नाक्याजवळ चारचाकी कार क्र.एम.पी.०९ डब्ल्यू.एल.३९१५ वरील अज्ञात चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.तिन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र अलीशान रहिमान तडवी या महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.या घटनेबाबत रसूल तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.