Just another WordPress site

आडगाव येथे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत टीबी मुक्त भारत अभियान संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ नोव्हेंबर २५ शुक्रवार

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त भारत अभियानाचे आयोजन जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ.दर्शना निकम,डॉ.तरन्नुम शेख व सरपंच अमीना रशीद तडवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.यावेळी त्यांनी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करून रुग्णांना मार्गदर्शन केले.या अभियानात उपकेंद्र अंतर्गत गावांमधील ७७ रुग्णांची तपासणी,२१ एक्स-रे तपासण्या तसेच १९ रुग्णांना सी वाय टी बी लस देण्यात आली.यावेळी सरपंच अमिना तडवी,सदस्य रशीद तडवी,बबलू न्हावी,वैद्यकीय अधिकारी डॉ.दर्शना निकम,डॉ.तरन्नुम शेख,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वकार शेख,डॉ.सोनल भंगाळे,डॉ.अशफाक शेख,डॉ.मोहसिन कुरेशी, डॉ.धनंजय जोशी इ.उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एलएचव्ही सरला चौधरी,एचए दीक्षांत प्रधान,आरोग्य सेविका शीला जमरा,आरोग्य सेवक पवन काळे(पाटील),जयेश माळी, मनोज बारेला,उमर रझा,मुजाहिद तडवी,सरदार कानाशा,डीईओ मुस्तफा तडवी,औषध निर्माण अधिकारी पिंटू तडवी,क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे,मिलिंद राणे,आशा स्वयंसेविका मनिषा पाटील, शाहीन तडवी,आशा तडवी,कुरशात तडवी,मंगला बारेला,सायरा तडवी,संगीता बारेला,मदतनीस आशा कोळी व वाहन चालक कुर्बान तडवी यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण झाली असून ‘क्षयमुक्त भारत’ अभियानाला चालना मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.