चोपडा येथील व्यापारी भिलाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात १९६ बाटल्या रक्त संकलित !!
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ नोव्हेंबर २५ शनिवार
तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व चोपड्यातील भाजी मंडईतील प्रमुख आडते व्यापारी भिलाजी भोमा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२२ नोव्हेंबर शनिवार रोजी १९६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान भिला पाटील थोर रक्तदाते म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असून त्यांनी आजवर शंभराच्यावर रक्तदान केले आहे.आडगाव येथे आज दि.२२ नोव्हेंबर शनिवार रोजी जीवन ज्योती रक्तपेढी धुळे यांच्या वतीने भिलाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिरात वेदांत कुलकर्णी,अक्षय बोरसे,ज्ञानेश्वर पाटील,राजेंद्र जगताप,सुनीला गावित, डिंपल पाटील,आदिती येवले यांनी रक्त संचय प्रसंगी भाग घेतला.प्रसंगी आडगाव येथे पंचायत समितीचे माजी सभापती प्राध्यापक भरत सर यांनी तसेच सेनादलातील जवान मुकुंदा जोशी,रमेश जे. पाटील यांनी भिलाजी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.यावेळी आडगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील,शेतकी संघाचे प्रेसिडेंट सुनील पाटील,संचालक श्यामकांत पाटील,चोपडा साखर कारखान्याचे संचालक पंडित रामदास पाटील,सेनादलातील जवान मनोज चौधरी,धनराज बाविस्कर,मंगल प्रताप पाटील,हर्षल मंगल पाटील आदींनी त्यांचे कौतुक केले.भिला पाटील यांनी रक्तदान केल्याचे सेंचुरी गाठल्याने त्यांनी जिल्ह्यात आडगावचा नावलौकिक मोठा केला आहे अशा शब्दात डॉक्टर सुरेश पंडित बोरोले यांनी त्यांचा गौरव केला आहे.तालुक्यातील आडगाव येथील थोर रक्तदाते भिला भोमा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक २२ रोजी सायंकाळपर्यंत १९६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.यात जीवन ज्योती रक्तपेढी धुळे यांनी या कामी सहकार्य केले.