यावल नगरपालिका निवडणूक विश्लेषण : प्रभाग २ मध्ये भाजपाच्या उमेदवार वंदना फेगडे यांना प्रचारात नागरिकांचा मोठा प्रतिसाद !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ नोव्हेंबर २५ शनिवार
येत्या दोन डिसेंबर २५ रोजी होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असुन सर्वच उमेदवार यांनी मतदारांशी होम टू होम संवाद साधण्यावर अधिक भर दिला आहे.यात यावल नगरपालिकेच्या नगरसेविका या पदासाठी प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ वंदना भुषण फेगडे यांनी आपल्या प्रभागात आपल्या सर्मथकांच्या बळावर प्रचारात आघाडी घेतली आहे.
यावल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगरसेविका या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ वंदनाताई भुषण फेगडे यांना उमेदवारी मिळाली आहे व त्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रभागात प्रचारास सुरूवात केली असुन त्यांना आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रोहीणी उमेश फेगडे यांच्या पॅनलला सर्व जाती धर्माच्या नागरीकांचा त्यांना समर्थन मिळतांना दिसत आहे.दरम्यान प्रचाराच्या वेळी आपल्या परिसरातील नागरीकांचे प्रतिनिधीत्व करतांना प्रशासनाच्या माध्यमातुन सार्वजनिक मुलभुत सुविधा त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडीअडीचणी ते समजुन घेत असुन आपल्या प्रभागात सेवेच्या रूपात विविध विकास कामे करणार असल्याचे सौ वंदना फेगडे या प्रचारा दरम्यान आपल्या मतदारांशी संवाद साधतांना दिसत आहे.