Just another WordPress site

बालपणी आकाशातील विमानाकडे कुतुहलाने पाहणारी सामान्य कुटुंबाची मुलगी झाली हवाई सुंदरी !!

तुम्ही कुठे शिकता यापेक्षा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी किती शिकता हे महत्त्वाचे-हवाई सुंदरी पायल नेवे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)

दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार

बालपणी वडिलांचे बोट धरून आकाशात उडणाऱ्या विमानाकडे कुतूहलाने पाहणारी मी सामान्य कुटुंबातील मुलगी आता हवाई सुंदरी झाली आहे.जेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तेव्हा तुम्ही कुठे शिकत आहात हे महत्त्वाचे नसते तुम्ही ध्येय गाठण्यासाठी कशा पद्धतीने शिकत आहात हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन यावल शहरातून प्रथमच हवाई सुंदरी झालेल्या पायल नेवे हिने तिने शिक्षण घेतलेल्या बाल संस्कार शाळेत नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आणि तेथील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.पायल ही सध्या इंडिगो एअरलाइन्स मध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत असून गेल्या महिन्यातच तिला पदोन्नती मिळून ती लीड केबिन अटेंडनट या पदावर रुजू झाली आहे.

यावल येथील अजय नेवे यांच्या कुटुंबात जन्मलेली पायल नेवे ही तरुणी आपल्या वडिलांच्या फोटोग्राफी व्यवसायात मदत करायची व वडिलांसोबत लहानपणी बोट धरून जात असताना आकाशातून उडणाऱ्या विमानाकडे ती कुतूहलाने पाहायची आणि तिला वाटायचे की कधीतरी आपण यात बसू,बालपणी विमानात बसण्याचे पाहिलेले स्वप्न रंगवत असताना तिने मराठी माध्यमातून शहरातील बालसंस्कार शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी ती पहिल्यांदा शहराच्या बाहेर गेली.इयत्ता बारावीमध्ये केवळ ६८.२० टक्के गुण असतांना सन २०१७ मध्ये तिने मर्चंट नेव्ही मध्ये प्रयत्न केले आणि तिची निवड झाली.दरम्यान तेथे एकही मुलगी नसल्यामुळे एकटीच मुलगी असल्याने तिने तेथील शिक्षण थांबवून इंटेरियर डिजाइनर साठी प्रयत्न केले.त्यानंतर तिने विविध कोर्स केले व या दरम्यान मुंबईमध्ये अनुभव आणि शिक्षण घेण्यासाठी व्ही एफ एस ही विजा कंपनीमध्ये तिने जॉब सुुरू केला तेथे फेब्रुवारी २०१९ मध्ये फ्रान्स डिपार्टमेंट साठी जॉईन झाली.२०२१ पर्यंत तिथे तिने नोकरी केली तर जॉब करत असतांना अडीच वर्षात विविध ठिकाणी तिने मोठ मोठ्या एअरलाइन्स कंम्पनीमध्ये अडीच वर्षात सात वेळा हवाई सुंदरी म्हणुन इंटरव्यू दिले.दरम्यान तिची २०२२ मध्ये आमदाबाद येथील इंडिगो एअरलाइन्समध्ये निवड झाली.मुलाखतीसाठी आलेल्या २७० मुलींमधून केवळ ६ मुलींची निवड झाली यात पायल नेवेचा समावेश होता.३ मार्च २०२३ ला इंडोगो मध्ये हवाई सुंदरी म्हणून तिची निवड झाली आणि १६ मार्च २०२३ ला तीने पहिल्यांदा हवाई सुंदरी म्हणून विमानात सेवेला सुरुवात केली.दरम्यान आता तिला पदोन्नती मिळाली असून ती लीड केबिन अटेंड म्हणून या पदावर रुजू झाली आहे व ती शहरात तिने शिक्षण घेतलेल्या बाल संस्कार शाळेत ती आली असता या ठिकाणी तिची मुलाखत मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एस. डी. देशमुख यांनी घेतली.यात तिने तिचा हा यशाचा खडतर प्रवास कथन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आणि सांगितले की तुम्ही कुठे शिक्षण घेता यापेक्षा तुम्ही कसे शिक्षण घेता आणि ध्येय निश्चितीसाठी तुम्ही काय काय करू शकता यावर तुमचे यश अवलंबून असते असे सांगीतले.तेव्हा विद्यार्थ्यांनी कुतूहलाने त्यांचे मार्गदर्शन ऐकले व नेवे हीने आपल्या शाळेचे देखील ऋण व्यक्त केले.

प्रारंभी देशांतर्गत व नंतर इंटरनॅशनल फ्लाईट

पायल नेवे हीला १६ मार्च रोजी हवाई सुंदरी म्हणून रुजू झाल्यानंतर प्रारंभी देशांतर्गतच तिला सेवेची संधी मिळत होती तर १४ डिसेंबर २०२३ पासून तिची निवड आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी देखील झाली.ती आजवर जगभराचे भम्रण करून आली आहे व आता तिला मागील महिन्यात पदोन्नती मिळाल्यामुळे वैमानिक सेवेतील मुख्य अटेंडेंट ती झाली आहे.

आजही कुटुंबास करते मदत

पायलच्या वडीलांचे यावल येथे झेरॉक्सचे आजही पायल सुट्टीवर आली तर या झेरॉक्सच्या दुकानावर ग्राहकांना ती झेरॉक्स तसेच संगणकीय सेवा देत असते आपण हवाई सुंदरी असले तरी कुटुंबाच्या व्यवसायामध्ये मदत केली पाहिजे म्हणून ती सुट्टी घेऊन घरी आली तरी वडिलांच्या व्यवसायात मदत करते.

Leave A Reply

Your email address will not be published.