Just another WordPress site

यावल नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ८ ब मधील भाजपा उमेदवार गोविंद बारी यांना विजयी करा-आ.अमोल जावळे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार

येथील नगरपालीका सार्वत्रीक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ ब साठी दि.२० डिसेंबर २५ शनीवार रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गोविंद मधुकर बारी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केले आहे.

यावल येथे काल एका कार्यक्रमास्थळी आमदार अमोल जावळे हे आले असता त्यांनी यावल नगरपालिकेच्या होत असलेल्या प्रभाग क्रमांक ८ब चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गोविंद मधुकर बारी यांच्या प्रचारासंदर्भात त्यांनी माहिती घेत पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला उमेदवार कसा विजयी होइल या करीता सर्वतोपरी प्रयत्न करून उमेदवारास विजयी करावे असे आमदार अमोल जावळे यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलतांना सांगीतले.यावल नगरपालीकेच्या प्रभाग क्रमांक ८ ब चे उमेदवार गोविंद मधुकर बारी हे विधीतज्ञ असुन यावल तालुका वकिल संघाचे ते माजी अध्यक्ष आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.