Just another WordPress site

न्यायालयीन आदेशानुसार विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ण करा अन्यथा आमरण उपोषण !! सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सुईवाल यांचा इशारा !!

तेल्हारा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार

तेल्हारा शहरातील नगरपरिषद मेन रोडला लागून असलेली नरेंद्र जीनींग फेक्ट्रीच्या हद्दीत असलेले उत्तरेस दिशेच्या बाजूस लघु व्यावसाईक यांच्या दुकानातील विद्युत पुरवठा नगरपरिषद तेल्हारा शहरातील पुर्ण अतिक्रमण मोहीम दरम्यान विद्युत पुरवठा अतिक्रमच्या वेळेस कापण्यास आले होते त्यात नरेंद्र जीनींग फेक्ट्रीच्या हद्दीतील व्यवसायिक यांचे पण विद्युत पुरवठा खंडीत कारण्यात आला होता.सदरहू अर्जदार नरेंद्र गोकुलचंद सुईवाल यांनी अतिक्रमण मोहीम वेळेस नगरपरिषदचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश गुरव व अर्जदार यांनी जागा संबंधित असलेल्या दस्तवेजाची शहानिशा करण्याकरीता पूर्ण दस्तावेज दाखवून शहानिशा करुन दिल्यावर त्या व्यवसायिकाच्या दुकानावर अतिक्रमणची कारवाई न करता त्या नरेंद्र जीनींग फेक्ट्रीच्या हद्दीतील दुकाने कायम राहिले.मात्र जीनींग फेक्ट्री कडून विद्युत पुरवठा करू नका असे पत्र विद्युत कार्यालयाला दिले व अर्जदार यांनी विद्युत पुरवठा पूर्वत जोडून द्या अशी विनंती सहाय्य्क तेल्हारा अभियंता व उपकार्यकारी अभियंता साहेब यांना केली असताना त्यांनी विद्युत पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे विद्युत पुरवठा करने शक्य होणार नाही करीता जागेची NOC आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान अर्जदार हे दाद मागणी करीता न्यायलयीन अकोट येथे दस्तावेजाची फाईल वकील मार्फत विद्युत पुरवठा मिळणे करीता सादर केली व न्यायालयीन आदेश पारित झाले व त्याची आदेशाची प्रत विद्युत कार्यालयात तेल्हारा येथे सादर केली असून त्या आदेशावर विद्युत वितरण कंपनी यांनी कनेक्शन पूर्वत केले नसून अर्जदार इतर व्यवसायकडून विद्युत री कनेक्शन पूर्ववत करने असे आदेश पारित असून सुध्दा विद्युत पुरवठा केला नाही त्या करीता अर्जदार इतर व्यवसायीक यांनी दि.१५ डिसेंबर २५ रोजीच्या लेखी अर्जात विद्युत वितरण कंपनी मेन हेड आफिस विद्युत भवन रतनलाल प्लाट अकोला येथे दिले व त्या अर्जाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय,एस पी कार्यालय,पालकमंत्री तसेच मुख्यकार्यकारी अभियंता अकोट,आमदार प्रकाश भारसाकडे,तेल्हारा येथे तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन व उपकार्यकारी अभियंता शेगाव रोड तेल्हारा येथे देण्यात आले आहे.सदरहू सदर अर्जात अर्ज दिले पासून पाच दिवसात न्यायलयीन आदेशा प्रमाणे रि कनेक्शन पूर्ववत करा अन्यथा तीस दिवसानंतर उपकार्यकारी अभियंता उपविभाग विद्युत वितरण कंपनी तेल्हारा या कार्यालयसमोर अर्जदार यांनी आमरण उपोषनाचा इशारा दिला आहे.यात उपोषण दरम्यान बरे वाईट झाल्यास मंडपासह सर्व जवाबदारी संबंधित अधिकारी याची राहील तसेच दोषी अधिकारी यांचे नाव अर्जात लेखी मधे दिले आहे हयांवर झालेले वि.जिल्हा.न्यायधीश -१ अकोट यांचे दि.२३जानेवारी २३ च्या आदेशाची अवमानना केलेल्या दोषी अधिकारी व कर्मचारी यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतील व न्यायालीन आदेशा प्रमाणे यांना विद्युत पुरवठा पूर्वत करतील की नाही व व्यवसायीक यांना वरिष्ठ अधिकारी न्याय देतील की नाही या कडे तेल्हारा वासियचे लक्ष लागले आहे व अशा अधिकारी याची मनमानी करने थांबेल की नाही हयांवर तेल्हारा शहरात ह्या विषयावर जोर धरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.