यावल नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसावर नगराध्यक्षपदासाठी अटीतटीच्या निवडणुकीत विजयाची चाबी शिंदे गटाकडे !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ डिसेंबर २५ शुक्रवार
येथील नगर पालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक २१ रोजी २०२५ रविवार रोजी सातोद रोड वरील तहसील कार्यालय यावल येथे होणार असुन प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.



दरम्यान यावल नगरपालीकेच्या निवडणुकीची वेळ दोन दिवसावर येवु ठेपली असुन निकालची उत्सुकता नागरीकांमध्ये पहावयास मिळत असुन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सौ छाया अतुल पाटील व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ रोहीणी उमेश फेगडे यांच्यात अटीतटीची निवडणुक लढत होणार असुन असे असले तरी विजयाची चाबी ही शिंदे गटाच्या उमेदवारा सौस्वाती मनोहर पाटील यांच्या हातात असल्याचे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. यावल नगर पालीकेच्या ११ प्रभागातील एकुण २३ जागांसाठी व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दिनांक २ डिसेंबर २०२५रोजी मतदान संपन्न झाले होते,यात एकुण ३३ हजार मतदारांपैक्की ७३ % टक्के मतदान होवुन यात २४ हजार१७२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला,दरम्यान ११ प्रभागातील प्रभागनिहाय झालेले मतदान प्रभाग क्रमांक१ एकूण मतदान३५४१, झालेले मतदान १६५८ , प्रभाग क्रमांक २मधील एकुण ३४४१ पैक्की झालेले मतदान २५६२ , प्रभाग क्रमांक ३मधील एकुण ३०९९व झालेले मतदान २३०४ , प्रभाग क्रमांक५मधील एकुण मतदान २२९९ झालेले मतदान १७०४, प्रभाग क्रमांक५मधील एकुण मतदान २६०३ झालेले मतदान २१५० , प्रभाग क्रमांक ६मधील एकुण मतदान २६५४ पैक्की झालेले मतदान २०२२ , प्रभाग क्रमांक ७ मधील एकुण मतदान२८३० पैक्की झालेले मतदान २०७७ , प्रभाग क्रमांक ८ मधील एकुण ३४३४ पैक्की झालेले मतदान २५३७,प्रभाग क्रमांक ९मधील एकुण मतदारांची संख्या २५८२ पैक्की झालेले मतदान १९४०,प्रभाग क्रमांक१०मधील एकुण मतदान २४०० पैक्की झालेले मतदान १६०५ , प्रभाग क्रमांक ११हा सर्वात मोठा प्रभाग यात एकुण मतदान५६१५ पैक्की झालेले मतदान ३५१३ असे मतदान झाले असुन, सर्वाधिक मतदान हे प्रभाग क्रमांक ५ मध्ये ८२ .५९ % टक्के झाले तर सर्वात कमी मतदान हे प्रभाग क्रमांक११मध्ये ६५.५१ इतके झाले आहे .