यावल येथे १ सप्टेंबर २२ रोजी मोफत पिंक ऑटो प्रशिक्षण नोंदणी
मराठी प्रतिष्ठान व मराठी अस्मिता तर्फे स्तुत्य उपक्रम
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- मराठी प्रतिष्ठान जळगाव व मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावल यांच्या संयुक्त विद्यमाने १ सप्टेंबर २२ पासून यावल तालुक्यातील महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण घेण्याकरिता नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.असे मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावल अध्यक्ष चेतन अढळकर यांनी कळविले आहे.
मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून पाच महिला प्रशिक्षण घेऊन ऑटो रिक्षा चालवीत आहेत.लवकरच काही दिवसात आणखी दहा महिला ऑटो रिक्षा व्यवसायात पदार्पण करणार आहेत.तसेच आणखी काही महिलांना ऑटो रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देऊन हा उपक्रम आणखी पुढे नेण्याचा मराठी प्रतिष्ठान जळगाव व मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावल यांचा मानस आहे.सदरील प्रशिक्षण घेण्याकरिता नाव नोंदणी हि १ सप्टेंबर २२ रोजी सम्राट मॉल समोर भुसावळ रोड यावल येथे केली जाणार आहे.व १५ सप्टेंबर २२ पासून सदरील नाव नोंदणी करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी महिलांना शासकीय दरात लायसन्स बॅच परमिट व रिक्ष घेण्याकरिता बँकेकडून अर्थसहाय्य्य मिळणेकरिता सहकार्य केले जाईल.तरी तालुक्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.लाभ घेण्याकरिता मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन अढळकर मो.नं.८६५७५४५२०२ व ९७३००७१०१५ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष चेतन अढळकर यांनी केले आहे.