महाविकास आघाडी (उबाठा ) गटाच्या छाया पाटील यांचा दणदणीत विजय भाजपाच्या रोहिणी फेगडे यांचा दारुण पराभव !! भाजपा नगरसेवक संख्या वाढली !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ डिसेंबर २५ रविवार
येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्ष सह अकरा प्रभागातील २३ नगरसेवक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज रविवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांततेत पार पडली.नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी भाजपाच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांचा दारुण प्रभाव केला आहे.छाया पाटील यांना १४ हजार १०६ तर भाजपाच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना ९ हजार ५६ मते,शिवसेना शिंदे गटाच्या स्वाती पाटील यांना केवळ ७३४ आणि अपक्ष उमेदवार सुलेमानी शबानाबी यांना २०६ मते मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या छाया पाटील यांनी पराभूत उमेदवार रोहिणी फेगडे यांच्या पेक्षा ५ हजार ५० मते अधिक ची घेऊन विजय मिळविला आहे.
दरम्यान विजयी नगराध्यक्षा छाया पाटील यांचे पती तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील (उबाठा) यांचा प्रभाग ११ ब मधून भाजपाचे हेमराज जगन्नाथ फेगडे यांनी २१७ मतांनी पराभव केल्याने गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. यावल नगरपालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी झालेले मतदान पाटील छाया अतुल ( शिवसेना (उबाठा) १४१०६; विजयी,फेगडे रोहीणी उमाकांत (भाजपा) ९०५६; पराभूत,पाटील स्वाती मनोहर ( शिवसेना शिंदेगट)७३४;पराभूत, सुलेमानी शबानाबी आरीफखा ( अपक्ष )२०६ पराभूत,प्रभाग निहाय विजयी झालेले उमेदवार असे व निकटचे दोन प्रतिस्पर्धी यांना प्रभाग क्रमांक १ अ सोनवणे शिला श्रीधर – अपक्ष (५७९) विजयी.तायडे छाया कौतिक – एम. आय.एम.(३२८) पराभूत,सोनवणे पूनम देविदास -भाजपा(३२६) पराभूत,गजरे अजय विजय – एनसीपी(२१६)पराभूत,१ ब खान अमेनाबी शाकीर – एनसीपी (७०२) विजयी.मोमीन सुमय्या बी शेख समीर-अपक्ष (३४४) पराभूत, निगार बी मोहम्मद अरशद- भाराकाॅ ( ३०३) महाजन रत्नाबाई गणेश -भाजपा.(२५४) २ अ तडवी रुबाब महमंद – भाजपा.(११९२) विजयी.तडवी हुसेन जहांगीर- शिवसेना (उबाठा)(६८५) पराभूत, तडवी मनोज लुकमान – शिवसेना (५९९)पराभूत,२ ब (सर्वसाधारण महिला):खान अंजुम बी कादीर – भाराकाॅ (१२८०) विजयी , फेगडे वंदना भूषण -भाजपा(९२३) पराभूत,चौधरी भारती अभिमन्यु- शिवसेना (उबाठा (२९५) पराभूत, सोनार ज्योती नितीन -शिवसेना (३४) पराभूत,३ अ शे शाहीन बानो शे रज्जाक – भाराकाॅ (९१०) विजयी. खाटिक जुबेदाबी शेख -एनसीपी (७२८) पराभूत, खाटिक जैनुर मोहिनुद्दीन -अपक्ष(६१७) पराभूत,३ ब (सर्वसाधारण):खान इमाम रजा समीर खान -अपक्ष (१३५५) विजयी.शेख असलम शेख नबी – भाराकाॅ (८०६) पराभूत,बारी राजेंद्र शामराव – शिवसेना(९०) पराभूत,प्रभाग क्रमांक ४ अ (अनुसूचित जाती महिला):
भालेराव शालुबाई भालचंद्र -भाराकाॅ (११७२) विजयी.जंजाळे लता अनिल भाजपा (३३४ )पराभूत,लोखंडे समिता अरुण – एनसीपी (१८२) पराभूत, ४ ब (सर्वसाधारण):कमरून्नीसाबी -भाराकाॅ (१०८५) विजयी.खा सईदा बी सलाम खा अ -एनसीपी (४६१) पराभूत,भालेराव सदानंद पंडित- शिवसेना (१२५) पराभूत,प्रभाग क्रमांक५ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग):शे निसार हमीद -( एनसीपी) (८२२)विजयी . पिंजारी एजाज कादर अपक्ष -(७१८) पराभूत,कुरेशी गनी साबीर खान-अपक्ष (५५८)पराभूत५ ब (सर्वसाधारण महिला):सईदा बी मोहम्मद याकूब (भाराकाॅ) (१०९१) विजयी, खान रुक्सार जबीन जमीर अपक्ष(१०४२) पराभूत,६ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग -महिला): कच्छी रुबीना बी उमर कच्छी -(भाराकाॅ) (१५८०) विजयी.
शाहीन बी शेख रशिद-अपक्ष (४२१) पराभूत,६ ब(सर्वसाधारण): कच्छी करीम कासम -अपक्ष(१०९८) विजयी.मनियार तनवीर करीम -(भाराकाॅ) (८५०)पराभूत,सपकाळे जागृती सागर -शिवसेना (६७)पराभूत ,प्रभाग क्रमांक ७ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग -महिला):वाणी कल्पना दिलीप – भाजपा(९४४) विजयी.धोबी रेखाबाई संतोष – शिवसेना (उबाठा)(६३९)पराभूत,बडगुजर आशा शांताराम – अपक्ष(४६६)पराभूत
७ ब (सर्वसाधारण):सराफ पराग विजय-अपक्ष(८७६) विजयी.
गडे सुरेखा सुरेशचंद्र-भाजपा (५७४)पराभूत,कोळी शरद रंगु – शिवसेना (उबाठा,(३४३)पराभूत, देवांग सागर अशोक अपक्ष(२५८) पराभूत, प्रभाग क्रमांक ८अ (सर्वसाधारण महिला):बारी वैशाली निलेश – शिवसेना (उबाठा)(१६००) विजयी.बारी संध्या पुंडलिक – भारतीय जनता पार्टी(८३८)पराभूत
बारी सुनिता संजय अपक्ष (७४ ) पराभूत, ८ ब (सर्वसाधारण):चौधरी सागरकुमार सुनील -(उबाठा) (१६२६)विजयी,बारी गोविंदा मधुकर भाजपा (१०३६)पराभूत ,प्रभाग क्रमांक ९ अ (सर्वसाधारण महिला):
चोपडे वर्षा निरज-एनसीपी(११७४) विजयी.महाजन देवयानी गिरीष – भाजपा (७१३)पराभूत,बारी मनिषा नितीन – अपक्ष(४२)पराभूत
९ ब (सर्वसाधारण):कोलते राकेश मुरलीधर -भाजपा (१३९७) विजयी
कचरे राहुल राजेंद्र -शिवसेना (उबाठा) (५०४)पराभूत,प्रभाग क्रमांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग):चौधरी योगेश विजय – भाजपा (७०७) विजयी.करांडे राजेश कमलाकर -अपक्ष (६३१)पराभूत
चौधरी युवराज विश्वनाथ – शिवसेना (उबाठा )(२६४)पराभूत
१० ब (सर्वसाधारण महिला):
महाजन नंदा राजेंद्र – भारतीय जनता पार्टी(१३००) विजयी.कोळी जागृती दुर्गादास – शिवसेना (उबाठा)(२४१)पराभूत,प्रभाग क्रमांक ११
* ११ अ (अनुसूचित जमाती महिला):नन्नवरे सविता विजय – भाजपा (२१२८) विजयी.कोळी सुरेखा शरद – शिवसेना (उबाठा)(१४०६)पराभूत, ११ ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग):फेगडे हेमराज जगन्नाथ – भाजपा (१७२३) विजयी,पाटील अतुल वसंत – शिवसेना (उबाठा )(१५०६)पराभूत
चौधरी मधुकर मुरलीधर – अपक्ष(३२१)पराभूत,११ क (सर्वसाधारण महिला): येवले शुभांगी रोशन -भाजपा (१३६४) विजयी.
शिंदे मिरा नरेंद्र – शिवसेना (उबाठा)(९१७ ) अडकमोल आशालता वासुदेव – शिवसेना (९११)
शिर्के पुजा विशाल – अपक्ष (४०२)
नोटा मतांचा समावेश–
नगराध्यक्ष पदासाठी १३७ नागरिकांनी यापैकी कोणी ही नाही असे नकारात्मक मतदान केले आहे . तर नगरसेवक पदाचे निवडीसाठी ही नकारात्मक ५६ मतदान केले असून नकारात्मक मतदान हे राजकारणा साठी चिंताजनक आहे.
मतदान शांततेत
मतदान केंद्रावर, सकाळी दहा वाजेला मतदान मोजणी प्रारंभ झाला मतमोजणी शांततेत पार पडली . निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी नियोजनबद्ध केंद्राची उभारणी तसेच नियोजन केले होते. मतदान केंद्रात पोलिसांकडून फेरी निहाय मतदान प्रतिनिधींना तपासणी करून आत मध्ये सोडले जायचे. तहसील कार्यालयातील अधिकारी यांचे सहकार्य लाभले .मतमोजणी केंद्राच्या बाहेर हजारो नागरिकांची उपस्थिती होती विजयी उमेदवार घोषित होताच गुलाल अबीर उधळून जल्लोष करण्यात येत होता
छाया पाटील सुरुवातीपासूनच आघाडीवर!
उबाठा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या ही आघाडी त्यांनी सातव्या फेरी अखेरपर्यंत कायम ठेवली
चोख पोलीस बंदोबस्त
मतदान केंद्रासह केंद्र परिसरात चोख बंदोबस्त फैजपूर उप विभागीय पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
शहरवासीयांसह महाविकास आघाडीचा विजय माजी नगराध्यक्ष अतुल पाटील
उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांच्या विजयाबद्दल माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी , प्रतिक्रिया देताना म्हटले की, सत्ताधारी गटारी सर्व क्लुप्त्या करून विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही शहरातील नागरिक कोणत्याही आमिषाला बळी पडले नसून महाविकास आघाडी वर विश्वास ठेवून तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेले श्रम व माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील झालेल्या विकास कामावर जनतेनी विश्वास ठेवून पत्नी छाया पाटील भरघोस मतदान केले हा विजय यावल शहरवाशीयांसह महाविकास आघाडीचा आहे
यावल शहरवासीयांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही—धनंजय चौधरी(राज्य एन एस यु आय सरचिटणीस रावेर विधानसभा क्षेत्र)
महाविकास आघाडी सर्वधर्म समभावाचे राजकारण करत करते यासह विकासाचे राजकारण करते यावल वाशीयांनी यावरच विश्वास ठेवून, नगराध्यक्ष पदासह घटक पक्षातील उमेदवारांना बहुमताने निवडून दिले जनतेने टाकलेल्या या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही