Just another WordPress site

यावल नगरपालीकेत प्रथमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन महिला नगरसेवकांची एंट्री !!

यावलपोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ डिसेंबर २५ मंगळवार

येथील नगर पालीकेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असुन यात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे तिन महिला उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवुन नगरसेवकपद संपदीत केले आहे.

यावल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक करीता दिनांक २ डिसेंबर २०२५रोजी मतदान होवुन तब्बल १९ दिवसाच्या लांब प्रतिक्षेनंतर दिनांक २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होवून या निवडणुकीत बहुतांश नवीन व तरुण उमेदवारांना मतदारांनी यावल नगरपालीकेच्या माध्यमातुन शहराच्या विकासाची सुत्रे हाती सोपवली असुन, यात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक १मधील आमेनाबी शाकीर खान या ७०२ मिळवुन विजयी झाल्या असुन,प्रभाग क्रमांक२मध्ये अंजुमबी कदीर खान या १२८० मते मिळवुन आणी प्रभाग क्रमांक ९मध्ये वर्षा निरज चोपडे १४७४ मते घेवुन या तिन नवख्या महिला उमेदवार नगरसेवक म्हणुन विजयी झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.