यावल – पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २५ बुधवार
तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला असून पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
या कार्यक्रमास आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीचे अध्यक्ष अजित (राजू) तडवी,सकावत तडवी,मुराद तडवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युनुस तडवी,ग्राम महसूल अधिकारी श्रीमती अंजुम तडवी,शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली कोष्टी व उप शिक्षक आसिफ तडवी यांची उपस्थिती लाभली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाचे महत्त्व पटवून देत शिक्षण हे उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.