यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २५ बुधवार
येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालय या शाळेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांसाठीची हिवाळी शैक्षणिक सहल दि.२३ डिसेंबर २५ रोजी चंदनपुरी,चांदवड,नाणे संग्रहालय नाशिक,फाळके स्मारक,पांडवलेणी,पंचवटी,स्वामिनारायण मंदिर,काळाराम मंदिर या ठिकाणी संपन्न झाली.
दरम्यान नाणे संग्रहालयामध्ये मुलांनी प्राचीन नाणे तसेच विविध वस्तू विनिमय पद्धती,प्राचीन वास्तू प्रतिकृती यांची ओळख करून घेतली.यावेळी विद्यार्थ्यांनी समुद्री जीवाश्म संदर्भातील माहिती मिळविली.स्वामीनारायण मंदिरामध्ये मंदिराच्या पुरातन काळातील भाविकांचे लक्ष वेधणाऱ्या कोरीव कामांनी विद्यार्थ्यांचे देखील लक्ष वेधून घेतले.सर्व विद्यार्थ्यांनी या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या सहलीचा आनंद घेतला.विद्यार्थ्यांच्या या अस्मरणीय सहलीला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गर्गे,एल.व्ही.चौधरी,एन.ए.बारी,एस.डी.देशमुख,के.एम.लोंढे,अंजली कवडीवाले,एम.एस.अट्रावलकर,दीपक सपकाळे आणि सुनील सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.