Just another WordPress site

यावल पुर्व वनविभागाच्या धडक कारवाईत मोटर वाहनासह ४ लाख ५० हजार रूपयांचा अवैद्य तोडीचा लाकूड मुद्देमाल जप्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ डिसेंबर २५ शनिवार

यावल वनविभागाच्या पथकाची वृक्षतोड माफीयाच्या विरूद्ध धडक कारवाई यावल पुर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन मोहमांडली राऊंड पथकासह यावल फैजपूर रस्त्याने गस्त करीत असतांना संशयित ट्रक क्रमांक एमएच -१९ झेड २४९९ वाहनांची तपासणी केली असता वाहणात निंब,बाभूळ,चिचलो प्रजातीचा जळाऊ लाकूड माल वाहतूक करीत असतांना मिळुन आले वाहन चालक शेख मोहिनुद्दीन शेख उद्बोदिन रा.रावेर ता.रावेर जि. जळगाव यांना सदर मालाची वाहतुक पास बद्दल विचारना केली असता त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा वाहतुक परवाना मिळून आला नाही.

सदरील वाहन तसेच जळाऊ लाकूड माल घ.मी १२ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ ( २ ब )41४२,५२ अन्वये व महाराष्ट्र नियमावली २०१४ चे नियम ३१,८२अन्वये जप्त निंब,बाभूळ,चिचोल प्रजातीचा जळाऊ लाकूड माल१२ घन मीटर माल किंमत १०२४८/-रु तसेच वाहन किंमत अंदाजे ४ लाख ५०,००० असे एकूण ४ लाख ६० हजार २४८ इतक्या किमतीचे असुन मुख्य विक्री केंद्र यावल येथे पावतीने जमा केला.गुन्हे कामी आगार रक्षक बि बि गायकवाड यावल यांनी गुन्हा क्रमांक ०४ / २०२५ दिनांक २५ डिसेबंर अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरील कारवाई ही उप वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव,सहाय्यक वन संरक्षक जमीर शेख यांच्यासह (प्रादेशिक व कॅम्पा) यावल चे समाधान पाटील,यावल पुर्व विभागा चे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाही दरम्यान मोहमांडली राऊंड पथक व आगार रक्षक यावल व वाहन चालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.