Just another WordPress site

यावल नगरपालीकेच्या नुतन नगराध्यक्ष छाया पाटील उद्या घेणार जनआशिर्वाद !! रॅली नंतर नगर पालीकेच्या कारभाराची सुत्रे स्विकारणार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ डिसेंबर २५ रविवार

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीत दणदणीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेबा ठाकरे गटाच्या नुतन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया अतुल पाटील या उद्या दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी जनआशिर्वाद रॅली नंतर यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची सुत्रे सांभाळणार आहे.

यावल नगरपालीकेच्या मागील २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सौ छाया अतुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख निसार शेख हमीद,शालुबाई भालचंद्र भालेराव,शाहीनबी शेख रज्जाक,कमरूनिसा शेख सैफुधीन,सईदाबी शेख हकीम मोहम्मद,रूबीनाबी उमर कच्छी असे ६ नगरसेवक आणी शिवसेना उबाठाचे सागरकुमार सुनिल चौधरी,सौ वैशाली निलेश बारी २ नगरसेवक असे एकूण ८ नगरसेवक विजयी झाले आहेत.दरम्यान या सर्व नगरसेवकांची उद्या सोमवार २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांच्या निवासस्थानाहून पदग्रहण व जन आशिर्वाद रॅली काढण्यात येणार असल्याची माहीती महाविकास आघाडीच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.