यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ डिसेंबर २५ सोमवार
येथील नगर पालीकेच्या महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थित नगराध्यक्षपदाची सुत्रे आज दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी स्वीकारली आहेत.यावल नगरपालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणुन मिळवलेल्या दणदणीत विजया नंतर आज दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी सौ छाया पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थित आज आपल्या नगराध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली.
याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने सह मुख्यधिकारी रविकांत डांगे व त्यांचे अधिकारी यांच्यासह माजी आमदार रमेश चौधरी,माजी आमदार शिरीष चौधरी,शिवसेनेचे उपनेते संजय सावंत,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी,शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद कोळी,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अन्सार खान,काँग्रेस कमेटीचे यावल शहर अध्यक्ष हकीम शेख मोहम्मद याकुब यांच्या महाविकास आघाडीचे विजय झालेले सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.नगराध्यक्षपदाची सुत्रे सौ छाया पाटील यांनी स्विकारल्यानंतर नगरपालीकेच्या बाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी व घोषणा देत एकच जल्लोष करण्यात आला.दरम्यान पदग्रहणानंतर महाविकास आघाडीच्या वतीने नुतन नगराध्यक्ष सौ छाया पाटील व त्यांचे विजयी झालेले सर्व सहकारी नगरसेवकांसह नगर पालीकेपासून शहरातील प्रमुख मार्गाने सवाद्य जन आशिर्वाद रॅली काढण्यात आली नंतर या रॅलीचे समारोप नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला.