Just another WordPress site

यावल नगर पालीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या गटनेतेपदी वर्षा चोपडे तर प्रतोद पदी अंजुम खान !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३१ डिसेंबर २५ बुधवार

येथील नगर पालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिन नगरसेवक हे नगरसेवकपदी विजयी झाले असुन वर्षा निरज चोपडे यांची नगरपालीकेच्या गटनेतेपदी तर प्रतोदपदी अंजुम बी कदीर खान यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाच्या वतीने काल नगरपालीकेच्या गटनेता पदाचा निर्णय घेण्यात आला असून यावल नगरपालीकेच्या प्रभाग ९ मधील विजयी झालेल्या वर्षा निरज चोपडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविका यांची गटनेतेपदी तसेच प्रतोदपदी प्रभाग क्रमांक २ मधील विजयी झालेल्या नगरसेविका अंजुमबी कदीर खान तर अपक्ष नगरसेवक करीम कासम कच्छी यांच्यासह चार नगरसेवकांच्या गटाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.निवड झालेल्या गटनेत्या वर्षा निरज चोपडे व प्रतोद अंजुम बी कदीर खान यांचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.