यावल पंचायत समिती चतुर्थ श्रेणी (शिपाई) कर्मचारी राहुल बावस्कर यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आज निरोप सोहळा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ डिसेंबर २५ बुधवार
येथील पंचायत समिती चर्तृथ श्रेणी कर्मचारी निष्ठेने प्रशासनात आपली सेवा बजावणारे राहुल बावस्कर हे आज प्रशासनातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवापुर्ती सोहळा यावल येथे आज दि.३१ डिसेंबर बुधवार रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
यावल येथे पंचायत समितीमध्ये शिपाई म्हणुन सेवाकार्य सांभाळणारे राहुल संपत बावस्कर हे मुळ भुसावळ येथील राहणारे असुन राहुल बावस्कर यांनी ८ ऑक्टोबर १९९८ पासून त्यांनी बोदवड येथे पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचारी म्हणुन आपली सेवा प्रारंभ केली होती.यानंतर ते यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दि.२३ जुलै २००२ पासुन रूजु झाले होते.आपल्या २७ वर्ष ४ महीन्याच्या प्रर्दीघ सेवेत त्यांनी दैनंदिन प्रशासनात आपुलकीने व हसतमुख शिस्तीचे पालन करणे हे त्यांच्या २३ वर्ष यावल येथे पंचायत समितीला दिलेल्या मोलाचे योगदान आहे.दरम्यान आज दि.३१ डिसेंबर २५ रोजी ते सेवानिवृत्त होत असून यावल पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी डॉ सौ मंजुश्री गायकवाड ( बोरसे )व आदिंच्या प्रमुख उपस्थितीत राहुल संपत बावस्कर यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.