Just another WordPress site

डोंगर कठोरा अच्युत धनाजी चौधरी विद्यालयातर्फे स्वच्छ शाळा उपक्रमाअंतर्गत विविधांगी उपक्रमांचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) : –

दि.०१ जानेवारी २६ गुरुवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु कॉलेजने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६ या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असून या उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज दि.०१ जानेवारी गुरुवार रोजी पथनाट्य व स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य तसेच संपूर्ण गावातून स्वच्छता जनजागृती रॅली काढून उपक्रमाची दमदार सुरुवात करण्यात आली.

दरम्यान सदर स्पर्धेचा उद्देश हा शाळा व गाव परिसरातील स्वच्छतेचे महत्व,प्लास्टिक व ई-कचऱ्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.या अनुषंगाने शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या विशेष सहभागाने स्वच्छता मोहीम,प्लास्टिकमुक्त परिसर,ई-कचरा व्यवस्थापन,जनजागृती रॅली,स्वच्छता विषयी पथनाट्य व तत्सम विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.परिणामी त्याचाच एक भाग म्हणून आज दि.०१ जानेवारी गुरुवार रोजी गावठाण परिसरात स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य व पथनाट्य सादरीकरण करण्यात आले तसेच संपूर्ण गावातून स्वच्छता जनजागृती काढण्यात आली.सदर उपक्रमाअंतर्गत वर्षभरात स्वच्छतेवर आधारित विविधांगी उपक्रम सादर करावे लागणार असून शाळेच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा या कार्यक्रमांना आधीच सुरुवात करण्यात आली आहे.तर आज पथनाट्य व स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य तसेच संपूर्ण गावातून स्वच्छता जनजागृती रॅली काढून उपक्रमाची दमदार सुरुवात करण्यात आली.याचबरोबर वर्षभरात स्वच्छतेवर आधारित गीत व तत्सम विविधांगी उपक्रमाचे आयोजन या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक नितीन झांबरे,अरुणोदय शिक्षण मंडळ चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,स्कुल कमेटी सदस्य एम ओ राणे,सरपंच नवाज तडवी,ग्रामपंचायत अधिकारी ए टी बगाडे,उपशिक्षक एन व्ही वळींकार,रामेश्वर जानकर,नयना पाटील,आर पी चिमणकारे,पी पी कुयटे,विवेक कुलट,मनीषा तडवी, शुभांगीनी नारखेडे,सोनाली फेगडे,चेतन चौधरी,सचिन भंगाळे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.