नासाच्या शास्त्रज्ञ अनिमा पाटील (साबळे) यांची किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जानेवारी २६ गुरुवार
अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञ अनिमा दिनेश साबळे (पाटील) यांनी किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी स्कुलच्या उपाध्यक्षा शैलेजा विजयकुमार पाटील यांनी शाल,श्रीफळ व बुके देऊन अनिमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी अनिमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना नासा विषयी सविस्तर माहिती दिली तसेच अवकाशात कशा पद्धतीने कार्य केले जाते,कोणकोणती मिशन त्याद्वारे चालविली जातात,आतापर्यंत कोणकोणत्या मिशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला इत्यादी बाबतची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.अवकाश संशोधन क्षेत्रात कार्य करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात हे देखील त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधन क्षेत्राविषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.विद्यार्थ्यांनी चिकित्सक प्रश्न विचारल्यामुळे त्यांनी नासाचे स्टिकर्स देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.अनिमा साबळे (पाटील) या शैलेजा विजयकुमार पाटील यांच्या बहिणीच्या मुलगी तर स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील यांच्या मावस बहीण होत.या कार्यक्रमास इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.