यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जानेवारी २६ गुरुवार
येथील नगरपालीका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ६ व २ अपक्ष नगरसेवकपदी विजयी झालेल्या नगर सेवकांच्या गटनेतेपदी कमरूनिसा बी सौफुद्दीन यांची तर उपगटनेतेपदी शालुबाई भालचंद्र भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटाची नोंदणी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी नगरसेविका कमरूनिसा शेख रज्जाक,शेख शाहीन शेख रज्जाक,शालुबाई भालचंद्र भालेराव,सईदाबी मोहम्मद याकुब,रुबीना बी उमर कच्छी,निगारबी मोहम्मद अर्शद यांच्या सह दोन अपक्ष नगर सेवक शिला श्रीधर सोनवणे व ईमाम खान समीर खान प्रामुख्याने उपस्थित होते.सदर गटनेतेपदी कमरूनींसा बी सैफुद्दीन व उपगटनेतेपदी शालुबाई भालचंद्र भालेराव तर अपक्ष नगरसेविका शिला श्रीधर सोनवणे व अपक्ष नगरसेवक इमाम खा समीर खान यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ६ नगरसेवक व अपक्ष २ नगरसेवक मिळून ८ नगरसेवकांचे यावल नगरपालिकेत गटस्थापन करण्यात आले आहे.कमरूनिसा बी सैफुद्दीन यांची गटनेतेपदी व शालुबाई भालेराव यांच्या निवडीचे माजी आमदार रमेश चौधरी,माजी आमदार शिरीष चौधरी,युवा नेते धनंजय चौधरी,काँग्रेस कमेटीचे यावल शहर अध्यक्ष शेख हकीम मोहम्मद याकुब यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.