यावल पालीकेत सत्ताधारी शिवसेना उबाठा नगरसेवकांच्या गटनेतेपदी सागर चौधरी व उपगटनेतेपदी वैशाली बारी यांची निवड !!
यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधि) :-
दि.०१ जानेवारी २६ गुरूवार
येथील नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दोन नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्ष व अपक्ष मिळून स्थापन करण्यात आलेल्या गटनेतेपदी शिवसेनेचे सागरकुमार सुनिल चौधरी यांची तर उपगटनेतेपदी वैशाली निलेश बारी यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या कडे नुतन नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक सागरकुमार सुनिल चौधरी व नगरसेविका सौ वैशाली निलेश बारी यांच्यासह अपक्ष नगरसेवक पराग विजय सराफ या चार जणांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. सदर गटात पक्षाचे सौ.छाया अतुल पाटील,सागर सुनील चौधरी, सौ.वैशाली निलेश बारी व अपक्ष नगरसेवक पराग विजय सराफ यांच्या समावेश करून यावल नगर पालीकेत स्थापन करण्यात आलेल्या गटनेते व उपगटनेते यांचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील,शिवसेना उबाठा चे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख शरद कोळी,शिवसेना माजी तालुकाप्रमुख कडू पाटील,यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष खर्चे,पप्पु जोशी,गोलु माळी,मनोज करनकर, सारंग बेहडे,योगेश चौधरी,मयुर खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे .