मुख्यमंत्री समृद्ध घरपट्टी पाणीपट्टी व अन्य कर वसुलीला मुदत वाढ द्या : सरपंच परिषदचे अध्यक्ष संदीप सोनवणेची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ जानेवारी २७ शुक्रवार
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी सरपंच परिषद मुंबई यावल तालुकाध्यक्ष संदिप सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसूलीत ५० टक्के माफ करण्यात आली होती त्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यत होती.मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान राबविण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत ग्रामपचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावाच्या निर्मिती साठी आवश्यक असल्याने यास ३१ मार्च २०२६ पर्यत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदचे यावल तालुकाध्यक्ष संदिप प्रभाकर सोनवणे, तालुका सचिव अजय अडकमोल सह पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.