यावलच्या नगराध्यक्ष छाया पाटील या एक्शन मोडवर पालीकेच्या पाणीपुरवठा योजनेसह सर्व विभागाचा घेतला आढावा !!
यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी ) :-
दि. ०२ जानेवारी २६ शुक्रवार
येथील नगर पालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्या नंतर एक्शन मोड पर आल्या असुन,आज त्यांनी नगर पालिकेत जावुन नगरपालीके च्या मागील सर्व कामांचा आढावा घेतला .
यावल नगरपालीकेच्या नुतन लोकनियुक्त नगराध्पक्ष सौ छाया अतुल पाटील यांनी आज प्रत्यक्षात आपल्या जनसेवेच्या कारभाराची सुरूवात केली . दरम्यान या वेळी त्यांनी यावल नगर पालिके चे सह मुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्या सह पाणीपुरवठा विभागाच्या अनुराधा कमलेश पाटील,बांधकाम विभाग व प्रभारी स्वच्छता विभागाचे अधिकारी संग्राम शेळके यांच्यासह सर्व विभागाच्या अधिकारी वर्गाकडून नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांनी यावल शहराकरीता मंजुर झालेल्या ५६ कोटी रुपयांच्या निधीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण स्थळ व जलवाहीनी च्या प्रगतीपथावर असलेल्या संपुर्ण कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला, यावेळी त्यांच्या सोबत नगरपालिकेचे सह मुख्याधिकारी रविकांत डांगे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक पराग सराफ,नगरसेविका सौ वैशाली बारी यांच्यासह नगरपालीकेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते . तत्पूर्वी नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांनी नगरपालिकेच्या मागील सर्व कारभाराचा विभागनिहाय आढावा घेत,अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर नगरपालिकेच्या माध्यमातुन शहरात सुरू असलेल्या कामांना पुर्ण करण्याच्या सुचना दिल्यात .